सावळा..
सावळा..
सांग सखे कुठूनी येती धुंद वेणीचे सूर ग..
भूल पडे हि गोकूळी..की सावळ्याची खूण ग..
मोहवतो वारा सांडूनि जशी कस्तुरी ग..
अन् वेढतो शेला त्या मुकूंदाचा या अंतरी ग..
ओघवता दिसता जरा..होई पाखरांची घाई ग
अलगद जशी चढे नभावर त्या निळ्याची निळाई ग..
स्रुष्टी सारी पांघरते मोरपंखी झूल ग..
बाधा होऊनी कान्हाची..उमले समर्पणाचे फूल ग
हळवा भासे राधेसम..यमूनेचाही घाट ग..
किती जन्म सोसूनी आतूर..पाहे क्रुष्णसख्याची वाट ग..
निर्मोही तो करूनी जाई अवघी काया पावन ग
मन होई मीरा.. जपूनी श्वासात मोहन ग..

