मी असाच जगलो होतो
मी असाच जगलो होतो
ती काटा बनली होती मी गुलाब बनलो होतो
मग करून वेडी प्रीती मी मिठीत शिरलो होतो
मी लपून थोडी प्यालो मन उदास होता प्यालो
देवदास बनून पारो मी नशेत रडलो होतो
मी शस्त्र टाकले नाही मी अजून हरलो नाही
मी तहात बसलो नाही मी रणात लढलो होतो
मी तुफान बनून मोठे सागरास भिडलो नाही
मी बनून छोटी होडी पाण्यावर तरलो होतो
मी हेवा केला नाही मी मत्सर केला नाही
मी पंकज बनून साधा चिखलात बहरलो होतो