STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

असे कसे घडायचे

असे कसे घडायचे

1 min
10

गुलाब ही रुसायचे असे कसे घडायचे

तुझ्याविना झुरायचे असे कसे घडायचे

तुझीच हाक गुंजते क्षणोक्षणी जिथे तिथे

तुझेच भास व्हायचे असे कसे घडायचे

युगे युगे मनात मी तुलाच पूजतो सखी

तुला न ते कळायचे असे कसे घडायचे

तुझीच प्रीत कालची तुला न आठवे गडे

छळून तू हसायचे असे कसे घडायचे

तुफान वादळात तू घनात पावसात तू

तुझ्यासवे भिजायचे असे कसे घडायचे

रणांगणात युद्ध मी तुझ्यामुळेच टाळले

अता मला हरायचे असे कसे घडायचे

तुझेच गीत गायचे तुझ्यात धुंद व्हायचे

उन्हातही फुलायचे असे कसे घडायचे

जगातली सुखे सखी तुझ्या मिठी पुढे फिकी

मला मिठीत यायचे असे कसे घडायचे

पहाटच्या धुक्यात मी तुलाच शोधतो सखी

दुरून तू पळायचे असे कसे घडायचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance