STORYMIRROR

Prasad Kulkarni

Romance

4  

Prasad Kulkarni

Romance

चाहूल थंडीची

चाहूल थंडीची

1 min
983


जाळ उन्हाचा वाढला

होई काहिली काहिली

जीव कासावीसं होई

धारा घामाच्या लागल्या


महिना मार्गशीर्ष आला

लागे थंडीची चाहूलं

रंग प्रेमाचा दाटला

गुलाबी होई ऋतूबदल


अवचित थंडी आली

सवे घेऊन प्रेमाला

साऱ्या सृष्टीत विणली

प्रणयरंगाची ग लीला


दिवस सान झाला 

रात्र मोठाली मोठाली

हवेत गारवा वाढला

काया कांबळ्यात कवळली


दिसे कानटोपी कुठे

कुठे शाल मफलरं

स्वेटरं रंगीत अनुठे

ऊब देती अंगावर


वर्ष संपताना येई

नववर्षारंभी राही

कुठे कडाक्याचे रूप 

थंडीची ही नवलाई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance