STORYMIRROR

Sunil Deokule

Romance

2  

Sunil Deokule

Romance

व्हॅलेनटाईन डे

व्हॅलेनटाईन डे

1 min
2.8K


तुला भेटण्यासाठी

आज काय नाही केले?

देवदर्शनाला जायचे

खोटे बहाने ही केले

नेमका आला रविवार

व्हेलेनटाईनच्या दिवशी

काॅलेजला व आॅफीसला

सुट्टी त्याच दिवशी

प्रेमात अन् युद्धात

सर्व काही चालतं

तुझ्या भेटी साठी

माझं मन धावतं

बाबांना आज बोलले

"जरा जाऊन येते!"

म्हटले आईला मी

"देवदर्शनाला जाते!"

तुझ्यासाठी जगते मी

लक्षात तुही ठेव

माझ्या साठी तरी तू

आहेस माझा 'देव' ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance