वेळेचा टाईमपास
वेळेचा टाईमपास
कोणी जाणतो वेळेचे महत्त्व
परिस्थिती ही सारी कळते
उपयोगी पडतो जो वेळेला
पदरी सारी निराशा सळते ।।१।।
डाव हा आशा निराशेचा
पचवीत घावावर घाव
करू जिवन सरल
लावित पैलतीरी नाव ।।२।।
शोधु उदयाचा प्रकाश
सरले कालचे काळोख
घोघावणारे वादळ शमेल
करू जिवनाची नवी ओळख
