वेळ सरते-सरते
वेळ सरते-सरते
सुई मागं सुई घड्याळात फिरते।
जिंदगानी चार दिस,वेळ सरते-सरते।।
इथे एका जन्माची एकच हे खेप
जो जे काही करील इथच भरते ।
घामाची कमाई,भलं एक काम
दौलत करोडोची बेकाम ठरते ।।
कष्टाचा एक घास,घोटभर पाणी
हक्काचे दोन श्वास,जीनं सफल करते।।
भट्टीत तापून घेतो जो आकार
यशाचा साकार, निर्झर तो झरते।।
जिंदगी येनं-जानं,समय खरं सोनं
सद उपयोगानं झोळी सुखानं भरते।।
सत्य अधिष्ठान,ज्यात समाजाचं भान
ज्ञानाच्या सागरात ती प्रतिभा तरते।।.
शिवकवी कवितेत खरं-खरं ते पेरते।
हे जीवन सरते, पण जगनं ऊरते।।...