वेदनेचे ते पसारे
वेदनेचे ते पसारे
मोकळ्या नभी विहरे कसा रे
भ्रमर मनाचा उदार का रे
मनाच्या डोहात बुडली ती
नको वाटती वेदनेचे पहारे
क्षणाचे आसक्त भान सारे
मनाचे क्षितिज मोकळे रे
भास अनामिक ओढ का रे
नको वाटती वेदनेचे ते सहारे
भाव भावनांचा कल्लोळ
आशेचा मना किरण हवा रे
प्रकाशित स्वयं साकारतेला
नको वाटती वेदनेचे ते किनारे
उगा जिव अडकतो कशास
संपल्या वाटा धुंडाळतो का रे
विसरले मागचे आठवी का रे
नको वाटती वेदनेचे ते पसारे
