STORYMIRROR

Pavan Pawar

Crime

2  

Pavan Pawar

Crime

वेदना

वेदना

1 min
73

मनाच्या वेदना आहेत भरपूर कशा मी व्यक्त करणार,

देशी वर टांगलेल्या अब्रु आज मी कशी सावरणार.

घराचे भविष्य होते काल सूर्याच्या प्रकाशात,

गळल्या सर्व पाकळ्या याचे फूल कसे बनवू.

स्पर्श कमळाचा होता हृदय वासनेत तडफडते,

कृत्य दैत्याचे घडल्यावर संसार कसा ती सावरणार.

मनाच्या वेदना आहेत भरपूर कशा मी व्यक्त करणार,


कुंभकर्णाचा आदर्श डोळ्यात असा भिनला,

आजचे संपूर्ण प्रशासन घोर निद्रेत गेला.

चाहूल नाही झाली तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येची,

आवाज नाही ऐकला एका कुटुंबाच्या शोकाची.

रामराज्याच्या नावावर हुकूमशाही चालवली,

शिवशाहीच्या नावावर मध्यमवर्गात त्राही माजवली.

कर्जबाजारी बापाला कोण आणि कसे वाचविणार,

मनाच्या वेदना आहेत भरपूर कशा मी व्यक्त करणार.


पुस्तके वाचण्याच्या वयात कसा छंद लागला,

इंटरनेटच्या नावावर सोलो पोर्न दाखवण्याचा गंध लागला.

मूलभूत गरजा सोडूनी आता विकृत गरजा प्रवेश करणार.

मनाच्या वेदना आहेत भरपूर कशा मी व्यक्त करणार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime