STORYMIRROR

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Tragedy

3  

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Tragedy

वेदना

वेदना

1 min
246

साक्ष अग्नी फेऱ्याची घेऊनी

का गं गेली मला आगीत टाकुनी

मन ही मन मनामध्ये हसुनी

का गं गेली मला सजणी सोडूनी


सात जन्माच्या फेऱ्या घालूनी

का गं गेली मला एकटं सोडून

जीवाला जीव तुझ्या देणारा

डोळ्यातून निघते अश्रुच्या धारा


संसार तुझ्या संगे थाटला

का गं जीव तू माझा बाटला

काळजाला फुटला आता घाम

वदनी शब्द निघते आता राम


अखंड सौभाग्याचं लेणं पुसूनी

कमरेला पदर लाऊनी

घाव काळजावर घालूनी

गेली खेळ आयुष्याचा करूनी


दान करून तुझे रुप

देवा खुलले हे फूल

उघड्यावर टाकुनी

कशी केली रे भुल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy