गणपती
गणपती
1 min
428
हे देवा रे तुझिया दारी
आलो मी आश्रयाला
वंदन करीतो देवा तुझे
आशिर्वाद मागतो देवा तुला
साईनाथा तुझ्या रे चरणी
नामे जप तुझिया वंदुनी
भजने होते घरोघर
मूर्ती बसली रे मनोमनी
पायी दिंड़ीचा सोहळा
भजनी झाले सर्व गोळा
गाव गाव चालुनी
भरती तुझीच रे शाळा
हे परमात्मा तू कल्याणकरी
भजन गातो तुझा वारकरी
झोळी पसरावितो तुझ्या रे दारी
मूर्ती तुझीच बसली रे घरोघरी
