विषय आज्जी
विषय आज्जी

1 min

12.3K
गोड तिची वाणी ।आज्जी देव ध्यानी ।
सर्वाना सांगुनी । दैववाणी ।।१।।
संसार सर्वागीं । निभावले तिन ।
जिवन हे जीण । उभे केले ।।२।।
सभ्य संस्कृतीची । आहे तिच गुढी ।
नाही जुन्या रूढी ।अंगी तिच्चा ।।३।।
नाते गोते धर्म । सर्वाना धरून ।
जोपासुन तिन । केले कर्म ।।४।।
आज्जी ममतेचा । अथांग सागर ।
कृपा जिवापार । मोठी तिची।।५।।