वेध विवाहाचे....
वेध विवाहाचे....
वेध विवाहाचे
भेटाया प्रियाला
मोहरले क्षण
मांडव भरला
क्षण आतुरले
जमले सगळे
आनंदी माहेर
उदयास मोकळे
पिवळी हळद
लागली अंगास
उष्टी हो दादाची
वधूच्या गालास
दादा शब्दवेडा
गालातच हसे
वहिनीच्या पण
लाज गाली दिसे
वेध विवाहाचे
दोघांच्या नयनी
नकळत फुले
सुख हो जीवनी
लक्ष्मीची पावले
येईल ग घरा
दादाच्या आनंदा
नाही पारावार
