वेडं मन..
वेडं मन..
एकच शब्द पुन्हा पुन्हा लिहतो
का उगीच मी तुझ्यात हरवतो..!
खरं तर मला शोधायचं असतं तुझ्यात
पण कोण जाणे मी तुझ्यातच विरघळतो..!!
नेहमी विचारत असतो स्वतः ला
का तुला एवढा जपतो मी..!
उत्तर मात्र पुन्हा पुन्हा तेच येतं
तुझ्याविना अपूर्णच आहे मी..!!
तुझ्या आठवणीच्या गर्द सावलीत
दिवस तर माझे निघून जातात..!
पण तुझ्या स्वप्नांच्या उजेडात
रातभर डोळे जागे राहतात..!!
तुझ्या एका शब्दाने, नजरेने
माझ वेडं मन शांत होतं..!
तुझ्या त्या शब्दात, नजरेत
मला माझे सगळं जग दिसतं..!!
