तू माझी कविता
तू माझी कविता
तू माझी कविता आहेस
अन् मी त्या कवितेत हरवलेले शब्द..!
मी एक उत्कट भावना
अन् तू त्या भवनातील नीरव शांतता..!!
मी तुझ्या कवितेतील शब्दांचा उच्चार
अन् तू त्या शब्दांमागचा सखोल अर्थ..!
मी त्या शब्दांनी पूर्ण झालेले वाक्य
अन् तू त्या शब्दातील पूर्णविराम..!!
तू कविता आहेस म्हणून
मी शब्द होऊन जगतो..!
नाहीतर माझ अस्तित्व केवळ
रिकाम्या पानासारखे आहे..!!
तू आहेस म्हणूनच मी
कायम पणं लिहला जातो..!
आणि मी शब्द आहे म्हणूनच
तू कायम अमर राहतेस..!!
