मनोराज्य
मनोराज्य
तुझी खूप आठवण येते
अन् जग पुन्हा हरवतं..!
वेडे,सैरभैर मन माझे
तुझ्यातच भरकटतं..!!
डोळ्यात माझ्या तुझच रूप
ओठांवर नित्य तुझच नाव..!
विसरायचं म्हटल तरी मन
घेते तुझ्याकडेच धाव..!!
तू नसतेस तरी कुठेतरी
तुझीच चाहूल लागते..!
प्रत्येक रात्री मन माझे
तुझ्यासाठीच जागते..!!
मुखावर हसूही आता खोटे
अन् अश्रूही झालेत सवयीचे..!
तुझ्याविना सगळे दिवस
वाटतात अधुरे अन् रिकामे..!!
विचारांच्या गर्दीत, कल्लोळात
तुझेच मनोराज्य असते..!
मी हरवलेलो असतो अन्
मन मात्र तुझेच असते..!!
