STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

वेदना माझी कळायला..

वेदना माझी कळायला..

1 min
2

वेदना माझी कळायला 
तुला, वेदना व्हावं लागेल.. 
वेदना होऊन वेदनेला 
आपलं मानावं लागेल..

वेदना माझी कळायला 
तुला, काळीज व्हावं लागेल..
कितीही दुखलं, खुपलं 
तरीही, धडधडावं लागेल..

वेदना माझी कळाययला 
तुला, अश्रू व्हावं लागेल..
पापण्यांच्या काठापाशी 
साठून राहावं लागेल..

साठून रहावं लागेल
कधी आटून जावं लागेल..
ओघळायचं नाही गालावरी 
शुष्क व्हावं लागेल..

वेदना माझी कळायला 
तुला, खोटं वागावं लागेल..
हसावं लागेल इतकं गोड 
दुःखालाही लाज वाटेल..

वेदना माझी कळायला 
तुला, *मी* व्हावं लागेल..
वेदनेनेही दृष्ट काढावी 
इतकं वेदनामय व्हावं लागेल..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy