सांग सखे..
सांग सखे..
कोऱ्या कागदावर लिहावं की मनातच ठेवावं..!
सांग सखे..माझ्यातली तुला मी कितीदा लिहावं..!!
डोळे मिटले तरी समोर तूच नेहमी असते..!
स्वतः ला, जगाला विसरून मन तुझ्यातच हरवते..!!
तुझ्या आठवणींच्या पावसात भिजत राहतो..!
तुझ्या अस्तित्वाच्या छायेत शांत बसतो..!!
हात हातात नसतो तरी साथ तुझी असते..!
दूर असली तरी हृदयाची धडधड वाढते..!!
स्वामींकडे मागतांना शब्द कमी पडतात..!
कारण प्रत्येक प्रथना तुझा आनंदच मागतात..!!
तुला वाटेल तेव्हा तू हक्काने रुसावं..! नाकावरच्या रागाला मी नेहमी मनवावं..!!
मनातल्या ह्या भावनाना मी कसं आवरावं..!
कोऱ्या कागदावर लिहावं की मनातच ठेवावं..!
