STORYMIRROR

Chandan Pawar

Others

4  

Chandan Pawar

Others

तुझ्याविना

तुझ्याविना

1 min
2

तुझ्यासोबत खूप हसायचं असतं 
पण डोळ्यात नेहमी पाणीच साठल..!
तुझा हात हातात घट्ट घ्यायचा होता
पण असमंजसपणे तू अंतरच वाढवल..!!

तुझ्यासवे खूप स्वप्ने पाहिली
पण तू अश्रूंसंगे वाहत गेली..!
तुझ्यासाठी राखून ठेवलेली वेळ
अबोला दुराव्यातच थिजून राहिली..!!

खूप काही सांगायचं असतं 
पण तू ऐकूनच घेत नाहीस..!
तू कधी शांतपणे विचार करत नाही
आणि माझ जग पुढे सरकत नाही..!!

तुला कधी कळेल माहित नाही 
हरवण म्हणजे काय असतं..!
तुझ्याविना जिवंत राहणं वेगळं असतं 
पण मनाने मरणं वेगळं असतं..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन