STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

वेदना..

वेदना..

1 min
2

तुटलो एवढा की लाख तुकडे होतील
जळून जाईल अन् सारं खाक होईल..!
नको देऊ सखे एवढ्या वेदना मला
एक दिवस या वेदनेतच हरवून जाईल..!!

मनातल्या आठवणींना तुझाच वास आहे
तुझ्याविना जगण्याचा हा जीवघेणा त्रास आहे..!
तू गेलीस तरी तुझी सावली सोबत असते
माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच भास आहे..!!

रात्री झोप येत नाही तुझ्या विचारांनी
डोळे भिजतात रोज तुझ्या आठवणींनी..!
तू नसतानाही मन तुलाच शोधत 
डोक्याच्या पार भुगा केला या भावनांनी..!!

कधी वाटतं विसरून जावं सगळं काही
पण मन म्हणत तू काय परकी नाही..!
तुटलेल्या स्वप्नांची कथा सजवत बसतो
कारण तुझ्याशिवाय आयुष्य पूर्ण नाही..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy