STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Romance

4  

.प्रमोद घाटोळ

Romance

वेडी पहाट

वेडी पहाट

1 min
416

प्रेमाला रोज भरते

पहाटेलाच का येते?

का बहरुनी जाती वृक्ष

म्हणूनी रात्र तरूण होते


सारूनी पाकळ्यांना

कळीचा गुलाब होतो

उधळूनि गुलाल सगळा

समीर गीत गातो


आकाश पांघरती ते जे

ते पण धुंद होते

बघुनी गोड यौवनेला

मदनाचा साज ल्याते


उमटतो डाग गाली

लाजते बुजरी रात्र काळी

आरवतो कोंबडा

सृष्टीस भरते शहाळी


सरते रात्र पारी

पसरतो प्रकाश सारा

पिंजलेल्या रजईतून येतो

उदयास मित्र तारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance