STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

वचन

वचन

1 min
170

नित्य वचनासी रहा

तुम्ही सारे प्रामाणिक 

वचनपूर्तीत येती

अडथळे ते कितीक


म्हणे दानशूर कर्ण 

माग हवे ते याचका

कवचकुंडले दिली

केली वचनपूर्तता


देई दशरथ राजा

कैकयीसी दोन वर

प्रिय पुत्र वनवासी

घाला पडे प्राणावर


प्राण गेला तरीसुद्धा 

वचनाला नाही मागे

पूर्ततेला वचनाच्या

प्राणांतिक यत्न लागे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract