STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Romance Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Romance Inspirational

वचन दे मला भेटण्याचे

वचन दे मला भेटण्याचे

1 min
199

*भेट* मजला प्रिया आज

वचन दे मला भेटण्याचे |

*भेट* नको आणूस काही

कारण नको पुढे रेटण्याचे | |१| |


*जीवन* तुज वाचून माझे

वाटते किती मजला उदास |

*जीवन* लागे घशातनं पुढे

घास कोरडा ढकलावयास | |२| |


*वास* पसरो सुगंधांचा घडता

तुझ्या माझ्या प्रीतिचा सहवास |

*वास* करो शांतंता अन् सौख्य

समाधान अनुभवता येवो खास | |३| |


*भास* नको मारूस अती प्रेमाचा

 दे वचन लवकर येण्याचे |

*भास**तुला जाणवतो माझा की स्वप्न 

फक्त पाहातोस घरी नेण्याचे? | |४ | |


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract