वैकुंठाचा प्रवास
वैकुंठाचा प्रवास
थरथरत्या हातांनी एकमेकांना दयावा साठीचा आधार
लटलट त्या पायांनी घ्यावा काठीचा आधार ।
थरथरत्या हातांनी माळावा काळ्याभोर केसांत रंगीत गजरा
उडाले रंग केसांचे अन् डोळ्यांचे लागल्या साठीच्या नजरा।
थरथरत्या हातांनी प्रेमाने घ्यावे मिठीत
धडधड ते हृदय बीपीने साठीत ।
थरथरत्या हातांनी बोलावे आपल्या पिलांना घ्यावे मायेच्या पंखात परत एकदा
दूर उडाली पाखरे न परत फिरतील आता पुन्हा एकदा I
थरथरत्या हातांनी एकमेकानां दयावा साठीचा आधार।
शेवटचा आता तो वैकुंठाचा तो आधार।
