वैभवशाली मराठी
वैभवशाली मराठी
इंडो युरोपीय मूळ कुळातील भाषा
संस्कृतापासून प्रचलित नऊ शतकात
भारतातील बावीस भाषां पैकी एक
माय मराठी माझी तिसऱ्या क्रमांकात.
लीळा चरित्र म्हाइंभटांचे प्राचिन
संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी प्रख्यात
छत्रपती शिवबाराजेंनी रोविली मुहूर्तमेढ
पेशव्यांनी विस्तारली तिला साम्राज्यात.
साहित्यांची दालने वैविध्यानी समृध्द केली
गोसावी,महिपती चरित्रे मुक्तेश्वरांच्या काव्यात
संत विजय,भक्ती विजय ह्या ग्रंथाद्वारे
घातली मोलाची भर मराठी साहित्यात.
राज्यभाषेचा दर्जा मिळाला एकोणीसशे साठ साली
पंचवीस टक्के ग्रंथालये स्थापिली महाराष्ट्रात
अहिराणी,कोकणी,कोळी,आगरी वऱ्हाडी
नऊ कोटी लोक बोलती मराठी विविध रुपात.
देवनागरी लिपीतली वळणदार अक्षरांची मराठी
काना, मात्रा,वेलांटी अन् चिंन्हाच्या आभूषणांनी
एका नवयुवती समान सकलांच्या मनात भरणारी
मवाळ भाषा,मनांना जवळ करणारी गोड स्वरांनी
फडके,खांडेकर,कानेटकर,दळवी,देशपांडे
महाराष्ट्राचे महान साहित्यकार मराठी साहित्यात
ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रजांचा जन्मदिन तोच
२७ फेब्रुवारी माय भाषेचा दिन मानला जगात.
