STORYMIRROR

Nalanda Satish

Fantasy

4  

Nalanda Satish

Fantasy

वाट समतेची

वाट समतेची

1 min
402

युद्धाच्या आणि बुद्धाच्या वाटेवर स्तंभीत 

थांबायचे की चालायचे आहे संभ्रमात 

वाटेच्या जाळ्यात अडकले पूर्णतः

सुखाच्या मृगजळात सापडले मी


स्वप्नांचे कलेवर नयनात होते

प्रभातीचे कोवळे रंग क्षितिजावर होते

अंधारले विश्व काळेशार ढग दाटून आले

विजेच्या कडकडाटात भेदरले मी


नदीच्या किनारीचं शांत खोल डोह होता

गोड सुखाचा मज भारीच मोह होता

तरंगाच्या दिशेने ओघात चालले

झपाटलेल्या सावलीने उध्वस्त झाले मी


करुणामयी चित्ताने बुद्ध हसले

स्वर्णपताका घेऊनि महामानव दिसले

सावरून पोखरल्या डोंगराला

किरणे कोवळी वाचावयास सरसावले मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy