Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

SURYAKANT MAJALKAR

Inspirational

4  

SURYAKANT MAJALKAR

Inspirational

वाट पाहतो श्रावणझुला

वाट पाहतो श्रावणझुला

1 min
6.5K


किती ग सांभाळू तुला

वाट पाहतो श्रावणझुला ||ध्रु ||


अल्लड, अवखळ, तुझे वागणे

हसण्यावारी माझे सांगणे |

ऐक माझ्या बकुळ फुला

वाट पाहतो श्रावणझुला ||1 ||


नजर तुझ्यावर ठेऊ किती

'रानरेड्यांची' वाटते भीती |

आली बघ सांजवेळ

वाट पाहतो श्रावणझुला ||2 ||


किती कराविशी लाड तुझे

शहाणे, नटखट बाळ माझे |

'वहाण ' माझी होई तुला

वाट पाहतो श्रावणझुला ||3 ||


जरी तू मुलगी, नाणे खणखण

खिदळत हास्य , नाचते अंगण |

वाट वाकडी, सांभाळ फुला

वाट पाहतो श्रावणझुला ||4 ||


विद्यासंप्पन, नावलौकिक,

आदरतिथ्य, हृदयसमीप |

देश-विदेश मिळो मान तुला

वाट पाहतो श्रावणझुला ||5 ||


Rate this content
Log in