STORYMIRROR

Venu Kurjekar

Comedy Romance

3  

Venu Kurjekar

Comedy Romance

वाट चुकून...

वाट चुकून...

1 min
229

वाट चुकून आलीस माझ्या घरी

जशी तू गुलाबी स्वप्नपरी......


आलीस तनमनाचा मदभरा मोगरा फुलवून

दिसताच तू,गेलो मनोमनी मोहरून......


वाहत होता गार वारा

अंगावर उठे शहारा......


तू श्वास रोखूनी, नेत्र मीटूनी उभी

मी पाहतो तारका आहेत का नभी....


खुळ्या मनाला कळेना

वेळ ऐन दुपारी, चक्क रहदारी.....


मी वेडा झालो होतो

मी, मी राहिलो नव्हतो....


ह्र्दयात धडधडत होते

कानशीलं तापली होती.....


माझी धुंद नजर

तुझा मुखचंद्र न्याहाळत होती....


अन्


" उठा आळसोबा उठा"

ऐकताच आईची हाक....


मुखचंद्र लपला ढगाआड

अन आली मला जाग.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy