वाट बघते सजना
वाट बघते सजना
वाट बघते सजना, येणे तुझे बाकी
आसुसलेले मन, अरे साद ही तुझी बाकी ।।धृ।।
रीत प्रितीची नको विसरु सजना
परदेशी माझं प्रेम सांभाळ साजना
सांगावा तुझा न आजूनही आला
परतीचा प्रवास ना सापडे तुला सजना
वाट बघते सजना, येणे तुझे बाकी
आसुसलेले मन, अरे साद ही तुझी बाकी ।।१।।
अंगणात दिसे छवी तुझी,
आठवणीची भासे दृश्य तुझी
येऊन देतोस तू हात माझ्या हाती
स्वप्ने बाकी अजूनही माझी तुझी
वाट बघते सजना, येणे तुझे बाकी
आसुसलेले मन, अरे साद ही तुझी बाकी ।।२।।
राजा राणी तू मी होते ना !
माझ्यात आज तू आहेस ना !
दोर ही विरहाची मग नकोना सजना
वाट पाहते मी तू ये ना सजना
वाट बघते सजना, येणे तुझे बाकी
आसुसलेले मन, अरे साद ही तुझी बाकी ।।३।।
ऋतू तुझ्या प्रेमाचा नको विसरु
दिवसा सारखे तू नको बदलू रे
होऊन वारा तुझे येणे नको रे आता
तुझे अस्तित्व अनुभवू दे ना रे !
वाट बघते सजना, येणे तुझे बाकी
आसुसलेले मन, अरे साद ही तुझी बाकी ।।४।।

