वातज्योत...!
वातज्योत...!
ज्योत म्हणाली वातीला
"तुझ्यामुळेच माझे
अस्तित्व ह्या जगी
उगाच का कुणी कुणाला
जपतं आपुल्या हृदयाशी" ?
घनघोर त्या अंधाराला
सारीते दूर आता मी
आहे तुझी साथ म्हणूनी...
आयुष्यभर राहिलीस तू
फक्त माझीच 'वात' बनूनी......!
लख्ख उजेडात त्या
गेले विसरुन तुझं जळणं
सार्यांनी ज्योत पाहिली पण
तुझं कुठं पाहिलंय मरणं ?
आनंदासाठी कुणाच्या तर
कुणाच्या सुखासाठी
तू जळलीस राख होऊन
फक्त माझ्या रुपासाठी......!
मी तेवणार तोवर
जोवर कण तुझा उरत नाही
उजेड माझा तोवरीच
जोवर जळणं तुझं संपत नाही.....
तुझ्या असण्यानं केवळ
मला सन्मान अाहे
तुझ्या नसण्यानं मी
तुझा निर्जीव प्राण अाहे......!
आता पणतीत ह्या
थेंब उरलाय एवढासा
वाराही वाहतोय
श्वास रोखतोय माझा....!
वार्यास त्या आता मी
ना घालणार भीक
एवढीच इच्छा माझी
मरण यावं मला
फक्त तुझ्यासोबत.......!
