वास्तवतेचा दाह
वास्तवतेचा दाह
वास्तवतेचा दाह
गरिबीच्या राज्यातले प्यादे आम्ही
मिळेल तिथे राबतो
पोटापाण्यासाठी वाट्टेल तेथे
पडेल ते काम करतो
आरोग्याची पर्वा नाही
हातापायाची काळजी नाही
जमेल तेवढे करत राहतो
कुटुंबासाठी सारे काही
पटत नाही मनाला
लहानग्यानांही काम करावं
गरिबीचं आलेली वाट्याला
मुकाट्यान लागतं सहन करावं
होरपळलं कोवळं मन वेदनाही झाल्या
वास्तवतेचा दाह डंख मारु लागला
पेटलं जीवनस्वप्न काम करता करता
विझलं आयुष्य जीवनास वणवा लागला
