STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Tragedy Inspirational

3  

Ganesh G Shivlad

Tragedy Inspirational

वास्तव क्षण..!

वास्तव क्षण..!

1 min
372

कल्पना स्वप्ने रंगवून झाली,

विलास सारे भोगून संपले..!

वास्तव क्षण नागडे होऊन

नजरेसमोर उघडे झाले..!


कोसळधारा बरसून गेल्या,

शेतीभातीचे खरडून नेले..!

गुरे ढोरे वाहून जाऊन

घरदार पोरे उघडे झाले..!


ऊन भोगांचे कडकड कडले,

बेगडी आवरण फिके पडले..!

डोळ्यांवरची झापड फाटून

रंग खरेखोटे उघडे झाले..!


फुले नाजूक सुकून गेली,

गालिचे हिरवे करपून गेले..!

पिवळी पाने गळून पडून

झाडफांदी खोड उघडे झाले..!


पुर आठवणींचे भरुन आले,

चित्र सामोरे उभे राहिले..!

अश्रू वाहिलेल्या नयनातून

विश्व तुझे माझे उघडे झाले..!


मनातले सारे आज ओठी आले,

शब्दां शब्दातूनी असे वाहिले..!

बाकी काहीच नाही हृदयातून

गणेशा थोडे दुःख उघडे झाले..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy