वारूळ
वारूळ
माझं घर माझं घर म्हणून
मुंग्या कधी भांडत नाहीत .
वारूळं देतात बांधून , पण
संसार कधी मांडत नाहीत.
सापांना हवी असतात
बिळं निवा-यासाठी .
करतात का कधी एवढं
माणसं माणसांसाठी?
स्टिल नाही , सिमेंट नाही
नाही वाळू अन् रेती..
वारूळाला वापरी मुंग्या
फक्त काळी माती...
अभियंतेही लाजतील
एवढं देखणं वारूळ होतं
वस्तीला मग सापांच
अख्ख कुळ येतं.