STORYMIRROR

Eeshan Vaidya

Tragedy

3  

Eeshan Vaidya

Tragedy

वारं सुसाट

वारं सुसाट

1 min
502

वारं सुसाट भिंगूळ

तार झडीची लागली

उठवणी आल्यागत

हाडं मोडू मोडू आली


फांद्याफांद्यात सैराट

झाड पिसाटलं दिसं

खोडा-मुळांत गोठलं

एक बधितसं पिसं


किरकिटी दात घेत

पोर उपाशी निजलं

सटवाईनं कपाळी

तसं असंल लिव्हलं


राडा चिखलमातीचा

भवताली पसरला

त्यात गडपला काटा

पायापायात घुसला


बैलखुरांत चिखल्या

हैरानली जितराबं

आता कवा कसं बापा!

शिवार ह्ये राही उभं?


वढा समींदर जाला

प्याया पानी कुटं शोधू ;

चुलखंड थंड जालं

पोटासाठी कसं रांधू?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy