वारांगना...!
वारांगना...!
वारंगणनेच जीणं
वाऱ्यासारखच
बे भरोशाच असत...
तिच्या जीवनाला
कधी कोठेच
स्थैर्य नसत...
वलीतल जीणं
तिच्या नशिबी
आलेलं असत...
तिला ते
पाचवीलाच
पूजलेलं असत...
कधी कधी
मोलाचं कार्य
तिच्या हातून घडतं..
वाट चुकलेलं
पाखरू जेंव्हा
जाळ्यात अडकत...
मोलाचा सल्ला
ती समाजसेवा
म्हणून देते...
तेंव्हा मात्र
समजाचीच
कीव करावी वाटते...
स्त्री पिडीत
कधी कधी
वेगळी वाट धरतात...
आणि
वारंगनेची पायरी
सहवासाने
नकळत चढतात..
तेंव्हा हीच
वारांगना मोलाचा
उपदेश त्यांना करते...
आणि
समाज बांधिलकी
म्हणून पाखरू
परत कुटुंबात सोडते..
आशा वारांगनांना
काय म्हणावं
कळत नाही..
त्यांच्या कार्याला
सलाम केल्यावाचून
राहवत नाही...
दुर्लक्षित जीणं नशिबी
आलं तरी त्या आनंदात
जीवन जगतात..
समाजावर त्या
जीवन जगता जगता
मोठं ऋण चढवतात..
आशा वारांगनांना मानाचे जीवन
बहाल करणाऱ्या प्रयत्नशील हातांना
ऋण मुक्त जीवन संघर्ष होण्यासाठी
कौतुकाने मानाचा मुजरा करूया....!
