वाणी
वाणी
वाणी असावी मधुर,
जणू फणसातले गरे
राग आले तरी चालेल
बोलावे नेहमी खरे....१
काही असती माणसं
समोर गोड बोलणारी
पोटात त्यांच्या वेगळंच
आतुन मात्र जळणारी....२
ओठात एक पोटात एक
जळत राहती इतरांवर
छुपे रूस्तुम म्हणती त्यास
नाही भरवसा तसल्यावर...३
पाठीमागून करती वार
सहन करत बसू नये
वाणी, नाणी, पाणी
नासवू कधीच नये....४
आला राग तरी चालेल
व्हावे कधीही समोरासमोर
चोरट्यांसारखे वागावे का
का बोलावे पाठमोरं....५
सत्य कधी घाबरत नाही
पवित्र असते त्यांची वाणी
असत्याला जे देती साथ
अवस्था त्यांची दीनवाणी...६
वाणी असावी शुध्द
अपशब्द तो टाळावा
करून घर अंतःकरणी
हात तो मिळवावा.....७
शुद्ध ज्यांचे आचरण
करते त्यास विनवणी
बालपणापासून सत्य
बोलावे अशी शिकवणी...८
नाहक चढविती इतरांना
गोड गोड त्यांचे बोलणे
नाही भरवसा स्वतःवर
स्वतःला समजती शहाणे...९
जगाला समजते सारे
अति काही करू नये
जीवन जगावे छान असे
भलत्याच उड्या मारू नये...१०
एक दिवस असा उजाडला
राहिले ना काही हाती
रिकामाच पडला देह रे
सरणावर मग जळती....११
