STORYMIRROR

Sandeep Dhakne

Tragedy Others

4  

Sandeep Dhakne

Tragedy Others

वादळ

वादळ

1 min
172

नमस्कारचे सुद्धा आता 

तुकडे पडलेत...


जय जिजाऊ,

जय भीम,

जय भगवान,

जय मल्हार,

जय रोहिदास,

जय राणा.


सकाळ सुद्धा आता 

जात घेऊनच उगवते...


शिवसकाळ,

भिमसकाळ,

लहूसकाळ.


समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन,

हातात लेखणीची मशाल घेऊन,

क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा 

आता जात सांगून टाकतात...


शिवकवी,

भीमकवी,

मल्हारकवी.


वादळं सुद्धा आता 

जात घेऊन येतात


भगवं वादळं,

निळं वादळं,

हिरवं वादळं,

पिवळं वादळं.


रंगात विभागलेत आता

पाऊस,वारा,वादळं


शहरातली दुकाने अन्

गावच्या वेशीसुद्धा...


...पण रक्ताचा रंग मात्र 

अजूनही लालच...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy