STORYMIRROR

Sandeep Dhakne

Inspirational Others

4  

Sandeep Dhakne

Inspirational Others

सत्कार आयुष्याचा

सत्कार आयुष्याचा

1 min
546

...सगळ्यांनाच नाही मिळत

दिव्य कौतुकाचा सोहळा

 काही सुखद क्षणांचा

करावा लागतो पालापाचोळा 

तुडवावी लागते काटयातून

जगण्याची पाऊलवाट 

तेव्हाच होतो मित्रा,सत्कार आयुष्याचा ।।


रात्रीचा दिवस करताना 

विसरावे लागते देहभान 

कास साहसाची धरल्यावर

खूणावते यशाची कमान 

दिसते अंधारात यशाची पहाट 

तेव्हाच होतो मित्रा, सत्कार आयुष्याचा ।।


सोबत असणारे सारे 

आपलेच मित्र असतात 

सोबत नसणारे सुद्धा

कोठे कमी पडतात 

विरोधकांना दाखवावी लागते

निर्धाराची पक्की वाट

तेव्हाच होतो मित्रा,सत्कार आयुष्याचा || 


नशीबवान आता मजला

लोक म्हणतील सारे 

त्यांना कोठे असते माहित

किती तोडले जिद्दीने तारे 

ध्येयाचा ध्यास घेताना

धावावे लागते सुसाट 

तेव्हाच होतो मित्रा, सत्कार आयुष्याचा ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational