एक परी
एक परी
1 min
303
नको करू अवहेलना
तुझ्या हळव्या मनाची
आई मी होईल फूल
काळजाच्या दाराची ||
सोसून साऱ्या यातना
दे झुगारून बंध
घेऊ दे मजला श्वास
तुझ्या जीवनाचा रंग ||
चिमुकल्या डोळ्यात
तुझी प्रतिमा पाहिन
मायेचा हळवा स्पर्श
मी ऱ्हदयात साठविन ||
जीव जन्माला येईल
सुख घरात नांदेल
तुझी सुंदर मुलगी
पणती वंशाची होईल ||
तुझ्या सुंदर आयुष्याची
मी एक परी होईल
जन्म घेऊ दे मजला
तुझ्या सावलीत राहिल ||
