STORYMIRROR

Sandeep Dhakne

Abstract

3  

Sandeep Dhakne

Abstract

बाप

बाप

1 min
341

भर उन्हात माझ्या सावलीसाठी धडपडणारा बाप.


काळजावर ऊन झेलत ,

पार कोमेजून गेलाय,

पण मातीशी असलेलं नात

अन् आभाळाला गवसणी घालण्याचं स्वप्न

अजून संपलेल नाही.


बाप कायम साखर पेरत राहिला माझ्या आयुष्यात ,

पण मला कधी गोड होता आलं नाही. 


ज्येष्ठ झाला बाप तरी,

मला समजत नाही.

दोन पिढ्यांच अंतर संवादात आडकाठी आणतं,

माझा वादविवाद संपला नाही,

अन् बापानं कधी संवाद सोडला नाही.


जगतोय अन् झिजतोय माझा बाप माझ्या स्वप्नासाठी अखंडपणे ,

पण मला अजून बाप समजलाच नाही.

पण एवढ मात्र समजल,

बाप समजण्यासाठी बापच व्हावं लागतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract