STORYMIRROR

Sandeep Dhakne

Others

4  

Sandeep Dhakne

Others

अवशेष

अवशेष

1 min
96

इतिहासाची एकेक पाने

आवाज देतात

आयुष्य घडवण्यासाठी, 

अन् आम्ही 

इतिहासाकडे दुर्लक्ष करून टाकतो

इतिहास जमा होण्यासाठी...


वेरुळ-अजिंठ्याचे शिल्प 

कित्येक पिढ्यांनी घडविले 

पण दिसले नाही कधी

दोन पिढ्यातले अंतर...


इथे जनरेशन गॅपच्या नावाखाली 

रोज होतोय आमचा वाद

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी... 


ताजमहलचे सौंदर्य डोळ्यात साठवताना

आम्ही मुमताजचा शोध घेतोय

ती असताना तिला झिडकारण्यासाठी अन् ती नसताना 

ताजमहाल बांधण्यासाठी...


उत्खननात सापडतील 

माणुसकीचे अवशेष

पण वर्तमानात जगत नाही 

माणूस माणसासाठी...


Rate this content
Log in