STORYMIRROR

Sandeep Dhakne

Others

4  

Sandeep Dhakne

Others

पहाट

पहाट

1 min
301

धरतीच्या या रूपाला

टिळा सुर्याचा लाविला ||


वेली पानाला बोलती 

आली पहाट अंगणी ||


फुले हळूच हसली

दव बिंदूत न्हाहली ||


आला पहाटेचा वारा

गुज मनात सांगती ||


घरटी सोडी पाखरे

करी लगबग सारी ||


पहाटेची गोड गाणी

मनामनात रूजली ||


सडा शिंपता शेणाचा

सुगंध काळ्या मातीचा ||


चुलीवरची भाकर

पहाटेचा हा संसार ||


चला जाऊया शेतात

पीके रूजली मनात ||



Rate this content
Log in