आठवण
आठवण
आता ती भेटत नाही
कविता मला सुचत नाही
हे वेड किती शब्दांचे
तरी आता संपत नाही ।।
काळजाच्या संवेदना
तिला कळत नाही
प्रेमाचा हळूवार कोपरा
स्वप्नासाठी तुटत नाही ।।
पाखराशी बोलताना
कुजबूज कानी येत नाही
भरारी घेण्यास बळ
पंखात आता मावत नाही ।।
आठवणीच्या गाभाऱ्यात
स्वर आता उमटत नाही
प्रेम विसरले अंधातरी
आठवण सरत नाही ।।
स्पदंनाच्या सुरावटीत
मन आता रमत नाही
दूर गेलीस अनाहूतपणे
प्रेम कधी मिटत नाही ।।