ती
ती
ती,
दिसली,
सुंदर...
लावण्यखणी
काळजात घर करणारी.......
मी
हरवून गेलो,
तिच्या डोळ्याच्या सागरात...
पण तिने पापण्या आता
बंद केल्यात.....
माझा श्वास आता गुदमरतोय
कारण मी तिच्या डोळ्यात उतरलोय...
वियोगाचे दुःख सहन होणार नाही...
या कल्पनेने माझ्याही डोळ्यात पाणी तरळल...
....खरच ती दिसलीच नसती तर,,

