वादळ
वादळ
वादळीच वाट अन्
वादळी स्वप्ने माझे
पोखरते जीवन अन्
मन होते वादळ माझे
वादळा पूर्वीची शांतता
गुदमरते जीव तो
भोव-यात घेतो वादळ
मातिमोल करतो तो
निशाणही कधी कधी
जागेवर राहत नाही
वादळ घेऊन जाते
जीवनही उरत नाही
काही वादळ असे
मनात पिंगा घालते
वादळ उठते विचारांचे
मन मनाशी भांडते
