STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

वाचताना वाटावं हे तर माझंच गड्या..

वाचताना वाटावं हे तर माझंच गड्या..

1 min
173

वाचताना वाटावं हे तर माझच गड्या

गीत कानी पडावे जसे कर्णमधुर जुने 

मंत्रमुग्ध होऊन जावे कुणी ही  

लिहावं असं काही तरी मनाच्या पानावर


गुपित सारे उलगडावे बिनधास्त 

सहज, हळुवार, अलगद, आतून 

साकारते चित्र सुंदर, मोहक, रास्त 

चित्रकाराच्या कुंचल्यातून


ती भेट अन् हवाहवासा स्पर्श, 

भाव विभोर प्रियतम आतुर 

भेटू कुठे कसे तिला तीच अवस्था 

आठवण तिची जणू क्षणा - क्षणाला 


प्रेमळ सहवास, त्याग, समर्पण,

त्या आणा-भाका दिल्या घेतल्या 

घडावं असं काही कळत - नकळत 

थांग - पत्ता लागू न देता कुणाला 


ते क्षितिज वसंधरेवरती नभ जणू टेकले

की मृगजळ केवळ भास हे तुझे वाटते?

सागर - सरीतेचे मिलन खरेखुरे अन् 

हिरवे स्वप्न साकार व्हावे तसे लिहावे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational