ऊन पावसाचा खेळ
ऊन पावसाचा खेळ
क्षणात येती त्या जलधारा
पडते त्वरीत लख्ख ऊन
खेळती लपंडाव ते जणू
चाले ऊन पावसाचा खेळ
पाठशिवणी यालाच म्हणू
सृष्टीचा अनुपम देखावा
सुंदर किती दिसे डोळ्यांना
इंद्रधनुष्य ते विहंगम
निसर्गाचे रूप मनोहर
ऊन पावसाचा हा संगम
गोड वाटे हा घटनाक्रम
पावसानंतर पडे ऊन
थेंब चमकतो पानांवर
वाटे गेला चमकून हिरा
हिरवं ल्यालेल्या मानांवर
