उपकार संतांचे
उपकार संतांचे
विठ्ठल रुक्मिणी पोटी । जन्मले ते आम्हासाठी।।
केली कामगिरी मोठी । उपकार संतांचे ।।१।।
निवृत्तीनाथ हुशार । सोपानदेव ही थोर।।
महाज्ञानी ज्ञानेश्वर । बोल खरे मूक्ताचे ।।२।।
कर्मटानी त्या छळले । दुःख सारे ते गिळले।।
जगाला साऱ्या कळले । मोल वेगळे त्यांचे ।।३।।
आश्र्चर्य ते मोठे किती । रेडा ही वेद बोलती।।
चालविल्या त्यांनी भिंती । ज्ञान ज्ञानदेवांचे ।।४।।
छोटी बहिण मुक्ताई । ज्ञानदेवां ज्ञान देई।।
कशी व्हावी उतराई । दंडवत आमचे ।।५।।
घेऊ संत शिकवण । होई जगाचे कल्याण।।
कशे फिटतील ॠण । थोर सर्व संतांचे ।।६।।
संतांचिया पायी सारे । माथा टेकवू चला रे ।।
पसायदान ते खरे । आम्ही आठवायचे..
