STORYMIRROR

Sonali Kose

Inspirational

3  

Sonali Kose

Inspirational

उपकार माझ्या रमाईचे

उपकार माझ्या रमाईचे

1 min
119

फाटक्या लुगड्यात 

थाटला गरिबीत संसार 

रक्ताचे करून पाणी

सोसला अत्याचाराचा मार 


चिमटा देऊनी पोटाला

बनली नवकोटींची माय

अपार वात्सल्याचा झरा

रमाई दुधावरची साय


भीमाला दिले बळ

परदेशी शिक्षण घेण्या

खंबीर सदा पाठीशी

संकटांवर मात करण्या


जातीपातीचा दूजाभाव

लोकं करीत होती स्वार्थाने 

तरी सोडला ना धीर तिने

राहिली लढत निस्वार्थाने


स्वतः उपाशी राहून

लेकरांना घास भरविले

अशिक्षित असली जरी 

चांगले संस्कार तिने दिले


अर्धांगिनी बॅरिस्टराची

म्हणुनी नव्हतं तिला गर्व

कित्येक दुःख , यातना भोगत

उभारले माणुसकीचे पर्व 


तेजोमय सूर्याची

जणू थंडगार सावली 

त्यागमुर्ती माता रमाई

दीन दलितांची माऊली 


शेण , दगड झेलत अंगावर

केला उध्दार दलितांचा

न खचता टाकले पाऊल पुढे

राखीत मान बाबासाहेबांचा


तिच्या निस्सीम कष्टाची

गाजली सर्वत्र किर्ती

उपकार माझ्या रमाईचे

ठरली त्यागमूर्ती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational