उपदेश
उपदेश
उपदेश श्री समर्थ रामदास स्वामींचा,
करावा राष्ट्रप्रपंच घरप्रपंचाबरोबरीने, विचार, आचार, उच्चार असावा सत्य, निती व न्यायाने,
कार्य करावे, थारा नको आळसाला,
येऊ शकतो कधीही मृत्यू चा घाला,
यत्न तो देव जाणावा,
फळ मिळे कष्टकऱ्याला ,
काळ कठीण जरी, तरी गडबडून न जावे बोलणे व्यर्थ न करावे,
धीराने हिताचे कार्य करावे,
मित्र तो विवेकी असावा संग तो सज्जनांचा धरावा ,
जन्म अमूल्य हा व्यर्थ न घालवावा.
जय जय रघुवीर समर्थ.
